Tuesday, March 3 2026 1:53 pm

ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांची लक्षणीय कामगिरी

ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी नुकत्याच झालेल्या दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. या दोन्ही संघांचे ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सोमवारी कौतुक केले. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (क्रीडा) मीनल पालांडे उपस्थित होते. मंगलोर कबड्डी स्पर्धेत महिला संघ विजयी झाला तर पुरुष संघाला तिसरा क्रमांक मिळाला. तसेच, अकोला येथील हनुमान क्रीडा मंडळाच्या स्पर्धेतही महिलांच्या संघाने विजयी वाटचाल कायम ठेवली. तर, पुरुषांच्या संघाला दुसरे स्थान मिळाले.