Monday, December 22 2025 7:48 am
latest

ठाणे जिल्ह्यात 18 ठिकाणी असणार नाविण्यपूर्ण युवा मतदान केंद्रे

ठाणे, 18 : ठाणे जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. मतदारांना मतदानासाठी सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यात नाविन्यपूर्ण मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली असून जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एक मतदान केंद्रे ही युवा अधिकारी कर्मचाऱ्यांद्वारे चालविण्यात येणार आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायं. 6.00 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक मतदान केंद्र हे तरुण अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारे संचालित करण्यात येणार आहेत. या केंद्रांवरील कार्यरत सर्वच अधिकारी व कर्मचारी हे तरुण असणार आहेत. या मतदान केंद्रांवर नागरिकांना मतदान करणे सुलभ व सुखद व्हावे, यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील युवा मतदान केंद्रांची नावे
134 भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 10 ( नगरपंचायत कार्यालय वाडा तळमजला खोली क्र. 1 तालुका वाडा जिल्हा पालघर)
135 शहापूर अ.ज.- मतदान केंद्र क्र. 91 (खर्डी विभाग एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल, खर्डी, ता. शहापूर),
136 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 301 (ओसवाल इंग्रजी माध्यम शाळा, तळमजला खोली क्र. 5 अंजूरफाटा भिवंडी, जि. ठाणे),
137 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 127 (भिवंडी कॉलेज, भिवंडी ),
138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 376 (एच.एस.इंटरनॅशनल इंग्लिश हायस्कूल, मोहिली रोड, बल्याणी).
139 मुरबाड विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 61 (राजश्री सी एच शाहू महाराज विद्यालय, पवार कॉम्प्लेक्स, बेलवले, तळ मजला खोली क्र 1 बदलापूर पश्चिम),
140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 10 (खोली क्र. 1 तळमजला, आयटीआय अंबरनाथ जुना भेंडीपाडा, अंबरनाथ),
141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 203 (राजश्री शाहू महाराज विद्यालय उल्हासनगर मनपा प्राथमिक शाळा क्र. 29, रुम नं. 4 जव्हार सिनेमामागे उल्हासनगर नं. 3),
142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र – 65 (सम्राट अशोक विद्यालय, मुख्य इमारत, तळमजला खोली क्र. 6 तिसगांव कल्याण पूर्व ),
143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 183 (आय.ई. एस, चंद्रकांत पाटकर विद्यालय डोंबिवली पूर्व).
144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. –195 ‍( टिळकनगर विद्यामंदिर, आसदे).
145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ- मतदान केंद्र क्र. 195 (एस.एल. पोरवाल इंग्लिश हायस्कूल, 90 फिट रोड भाईंदर प.जि. ठाणे),
146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 438 (लिटील फ्लॉवर हायस्कूल, तळमजला रुम नं. 1, ब्ल्यूस्टार कंपनीजवळ, पोखरण रोड नं 2 ठाणे),
147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 170 (ठाणे मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, जे.के. ऑडिटोरियम हॉल, डब्ल्यू ई. पार्टीशन, वागळे इस्टेट, ठाणे,
148 ठाणे विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 403 (व्ही.पी.एम कॉलेज ऑफ सायन्स, बिल्डिंग नं. 6 गर्ल्स रूम, तळमजला, ठाणे)
149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 51 (लघु पाटबंधारे ‍विभाग, कळवा),
150 ऐरोली विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 174 (कै. ‍जमनाबाई जनार्दन मढवी, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 48, तळमजला खोली क्र. 2सेक्टर 7 दिघा गाव, ऐरोली ),
151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 25 (कर्मवीर भाऊराव पाटील मॉडर्न कॉलेज, तळ मजला, रुम नं. 4 सेक्टर 16 वाशी, नवी मुंबई)