‘वीड टू वेल्थ’ प्रकल्पामार्फत बचत गटांतील महिलांच्या मदतीने भेटवस्तू तयार करण्याचे नियोजन सुरू
ठाणे, 09- उल्हास नदीतील जलपर्णींचा वापर करून महिला बचत गटांमार्फत भेटवस्तू तयार करण्याच्या उद्देशाने दि. ८ एप्रिल, २०२५ रोजी जलपर्णी व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रकल्प संचालक, छायादेवी शिसोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर अध्यक्ष अजय बहुद्देशीय संस्थेच्या व्यवस्थापक स्वाती धोटकर यांचा मार्गदर्शशाखाली म्हारल, काबां, वरप येथे जलपर्णींची पाहणी करण्यात आली. तसेच म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये उमेद अंतर्गत असलेल्या महिलांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाने उल्हास नदीतील जलपर्णींपासून विविध भेटवस्तू महिला बचत गटांमार्फत तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. बचत गटांतील महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी तसेच विविध कलागुणांना वाव देण्यासाठी ‘वीड टू वेल्थ’ प्रकल्प महत्त्वाचा आहे. – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रकल्प संचालक, छायादेवी शिसोदे
बचत गटातील महिलांसोबत जलपर्णी पासून उद्योग व व्यवसाय या विषयी चर्चा करण्यात आली तर जलपर्णी पासून तयार करण्यात आलेल्या वास्तू महिलांना दाखविण्यात आले. महिलांना रोजगार निर्मिती बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या भेटीदरम्यान अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापिवली, साई या ग्रामपंचायतींच्या नदीवर देखील प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेण्यात आली.
या क्षेत्र भेटीदरम्यान गट विकास अधिकारी, प. स. कल्याण संजय भोये, जिल्हा अभियान व्यवस्थापक सारिका भोसले, कृषी अधिकारी, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक SIIB CB, प्रभाग समन्वयक सर्व कल्याण, प्रभाग समन्वयक अंबरनाथ, ग्रामविकास अधिकारी, अंबरनाथ तालुक्यातील विस्तार अधिकारी (ग्रा. पं) आदी उपस्थित होते.
