Monday, December 22 2025 7:24 pm
latest

जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी महायुतीचे सरकार हवे यासाठी नजीब मुल्ला यांना निवडून द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 14 – महायुतीचे सरकार निर्णय घेणारे सरकार आहे, यासाठी महायुतीचे सरकार हवे, याकरीता येत्या २० तारखेला महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाण्याचा मुख्यमंत्री असल्याने ठाणे जिल्ह्यात विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत. कल्याण लोकसभा क्षेत्रातील ज्यात मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ येतो, इथल्या विकास कामांसाठी पाच हजार कोटीचा निधी आणला. महायुतीच्या वचननाम्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत माता भगिनिंना १५०० वरुन २१०० रुपये देणार येणार, लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसदलात २५ हजार महिला पोलिसांची भरती केली, शेतकऱ्यांची कर्ज माफी व १५ हजार देणार, गरजवंताला अन्न, वस्त्र, रोटी, कपडा, मकान देणार, ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन १५०० वरुन २१०० करणार, जीवनावश्यक वस्तुंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवणार, २५ लाख रोजगार निर्मिती, १० लाख बेरोजगार तरुणांना १० हजार प्रशिक्षण भत्ता देणार, २५ हजार गावात पाणंद रस्ते करणार, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांना महिना १५ हजार मानधन, शेतकऱ्यांच्या वीज बिलात ३० टक्के सवलत, सरकार स्थापनेनंतरच्या १०० दिवसात व्हिजन महाराष्ट्र २०२८ जाहीर करणार, टोरन्ट बंद करणार, हे महायुतीचे सरकार निर्णय घेणारे सरकार आहे ठाणे जिल्हा हा महायुतीचा आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचा बालेकिल्ला आहे. या ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्र्यावर दिघे साहेबांनी प्रेम केले. इथे युतीचे मतदार राहतात. नजीब हा तरुण आहे, ठाण्याचा सुपुत्र आहे, कोकणी मराठी माणूस आहे, अभ्यासू आहे, ठाणे महापालिका त्याने गाजवली आहे, आता विधानसभा गाजविण्यासाठी विधानसभेत पाठवायचे आहे. येत्या २० तारखेला महायुतीचे उमेदवार लाडका भाऊ नजीब मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा, १४९- मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत (शिवसेना, भाजपा, आरपीआय-आठवले गट, आरपीआय-कवाडे गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी कळवा नाका येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी, मनोहर सुगदरे, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाचे कार्याध्यक्ष जयदिप कवाडे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, विभागप्रमुख विजय शिंदे, विभागप्रमुख शाम पाटील, शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, शिवसेना महिला जिल्हा संघटक लता पाटील, माजी नगरसेवक राजन किणे, प्रकाश बर्डे, गणेश साळवी, अशोक भोईर, राजेंद्र साप्ते, उमेश पाटील, मनोज लासे, विजया लासे,अनिता गौरी, गणेश कांबळे, अंकिता शिंदे, वहिदा खान, प्रियांका पाटील, मंगला कळंबे, जितेंद्र पाटील, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर, युवक जिल्हाध्यक्ष विरु वाघमारे आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्यासंख्येने मतदार उपस्थित होते.