Monday, December 22 2025 5:54 pm
latest

छत्रपती संभाजीनगरमधील मैदान परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी कडक निर्देश – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, 18 : छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या मालकीच्या सार्वजनिक वापरासाठी असलेल्या मैदान परिसरात अतिक्रमण व अवैध धंद्यांची वाढ होऊ नये यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले, असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विधान परिषदेतील सदस्य संजय केनेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

छत्रपती संभाजीनगर शहरातील भूमापन क्रम. 4796/ ब व 4799 या ठिकाणी असलेल्या मैदान परिसरामध्ये अतिक्रमण थांबवण्यासाठी जिल्हा परिषदेस आवश्यक त्या कारवाईसाठी सूचना देण्यात आल्या असून, सुरक्षिततेसाठी दोन बाजूंनी गेट बसविण्यात आले आहेत. तसेच, जिल्हा परिषदेमार्फत या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत झोननिहाय आणि प्रत्येक आरोग्य केंद्रानुसार प्रतिसाद पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.