Monday, December 22 2025 5:36 pm
latest

गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी; दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,19 : मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटल्याची घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बोटीतील लोकांना मदत वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांना वाचवता आले. या घटनेची अधिकची सविस्तर माहिती घेतली जाईल. दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाईल.