Monday, April 6 2026 8:27 am

गुरूवार शुक्रवार ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे (14) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची सद्याची साठवण क्षमता लक्षात घेता व पाटबंधारे विभागाने पाण्याच्या नियोजनाकरीता ठाण्यातील काही भागांतील पाणीपुरवठा गुरुवार दि. 15/06/2023 रात्री 12.00 वा. ते शुक्रवार दि. 16/06/2023 रात्री 12.00 वा पर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहील.

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये च वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर न. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील.

पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.