Tuesday, December 23 2025 7:13 am
latest

कोकण पदवीधर मतदार संघातून गोकुळ पाटील रिंगणात,शिक्षकांचा पाठींबा

ठाणे ,10 : कोकण पदवीधर मतदार संघातून गोकुळ रामजी पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नसलेले सर्वसामान्य कुटुंबातील शिक्षकांच्या समस्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले अपक्ष उमेदवार श्री गोकुळ रामजी पाटील यांना शिक्षकांच्या पाठिंब्यावर कोकण पदवीधर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.हिंदुस्तान मानव पक्षाचे अध्यक्ष, एडवोकेट अशोक माने साहेब ,त्याचबरोबर ठाणे जिल्हा विद्या सेवक पतपेढीचे ज्येष्ठ संचालक संदीप कालेकर सर,शिक्षक संघटनेचे रमेश सूर्यवंशी सर ,हिंदी भाषिक पदवीधर संघटनेचे सदस्य अतुल मिश्रा सर आणि अनेक शिक्षक उपस्थित होते.पदवीधर आमदार देखील शिक्षकच असला पाहिजे असे शिक्षकांचे म्हणणे आहे म्हणून त्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे गोकुळ पाटील म्हणाले.

गोकुळ पाटील सर गेल्या 29 वर्षापासून सर्व शिक्षक शिक्षकेतर संस्थापक यांच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी माजी आमदार रामनाथ मोते सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर एल आर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. सातत्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी गोकुळ पाटील सर अग्रेसर असतात त्यामुळे शिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे श्री पाटील यांनी कोकण पदवीधर मतदार उमेदवारी अर्ज भरला आहे.यामुळे कोकण पदवीधर मतदार संघात गोकुळ पाटील यांची उमेदवारी आव्हान ठरण्याचे चिन्ह आहे