Monday, December 22 2025 6:57 am
latest

कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या मंत्रालयातील विक्री व प्रदर्शनाला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट

मुंबई, 13 : मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाला गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी भेट दिली. यावेळी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यान, काही वस्तूंची खरेदीही राज्यमंत्री श्री. कदम यांनी केली. प्रदर्शनातील निर्मित वस्तू दर्जेदार व दैनंदिन उपयोगात येणाऱ्या असल्याने बंदीजनांचे राज्यमंत्री श्री. कदम यांनी यावेळी कौतुक केले. येरवडा कारागृह पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक रोड या कारागृहांमध्ये निर्मित वस्तूंचा या स्टॉलमध्ये समावेश आहे.

यावेळी गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पोलिस उप महानिरीक्षक योगेश देसाई, अधीक्षक राणी भोसले आदी उपस्थित होते.