Monday, December 22 2025 2:14 pm
latest

एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेत 20 हजारांचा दंड वसूल

ठाणे 05 : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व ठाणे महानगरपालिका प्रदुषण नियंत्रण विभागाने संयुक्तरित्या आज एकल वापर प्लॅस्टिक (सिंगल यूज प्लॅस्टिक्‍ कॅरीबॅग) बंदीबाबत मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेत वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत येणारे शॉपिंग मॉलसह 12 आस्थापनांना दिलेल्या भेटीत साडे आठ किलो प्रतिबंधीत प्लॅस्टिक जप्त करुन 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

विविध आस्थापनांतून साडेआठ किलो प्रतिबंधीत प्लॅस्टिक बाऊल, प्लॅस्टिक चमचे, ग्लासेस आदी साहित्य जप्त करण्यात आले. सदरची मोहिम ही सातत्याने सुरू राहणार असून एकल वापर प्लॅस्टिकचा वापर तसेच साठा करु नये असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.