Saturday, March 7 2026 2:11 pm

उथळसर प्रभागातील पदपथांवरील अतिक्रमण हटविली

ठाणे 10 : उथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील रुस्तमजी रोड, आकाशगंगा सोसायटी, पंचगंगा सोसायटी रोड तसेच तीन पेट्रोल पंप, एल बी एस रोड ते मीनाताई ठाकरे चौक येथील अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई तसेच पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याची, सामान जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

उथळसर प्रभाग समितीतील अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली. त्याचबरोबर, कोलबाड नाका येथील शोमिक इंटरिअर, सिंध पंजाब, मुकुंद मेडिकल, कृष्णा गिफ्ट स्टेशनरी, मोमोज कॉर्नर, क्लासिक फॅमिली रेस्टॉरट अँड बार यांचे समोरील जागेत केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई तसेच बांबू आणि ताडपत्रीच्या सहाय्याने अनधिकृतपणे बांधलेल्या शेड निष्कासित करण्याची कारवाईही अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आली.