Friday, November 14 2025 11:17 am

हुतात्मा दिनानिमित्त राज्यपालांनी वाहिली शहीदांना आदरांजली

मुंबई, 30 : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन, मुंबई येथे शहीद दिनानिमित्त महात्मा गांधी आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली म्हणून 2 मिनिटांचे मौन पाळण्यात आले ..

यावेळी ‘महात्मा गांधींच्या राजभवन भेटी’ या विषयावरील माहितीपट दाखविण्यात आला.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ३० जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैनतानी, सहसचिव श्वेता सिंघल आणि उपसचिव प्राची जांभेकर, राजभवनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.