Wednesday, March 11 2026 12:42 am

ठाणे महापालिकेत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

ठाणे 25 : 25 जानेवारी हा 2024 हा 14 वा राष्ट्रीय मतदार दिवस आज ठाणे महापालिकेत प्रतिज्ञा घेवून साजरा करण्यात आला.

मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. यावेळी भारत निर्वाचन आयोगाने प्रसिद्ध केलेली मतदानाबाबत विविध भाषांमध्ये जनजागृती करणारी चित्रफित सादर करण्यात आली. तद्नंतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली.

यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, महेश सागर तसेच महापालिकेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.