Friday, June 18 2021 5:30 pm

१२७ अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे :  शहरामध्ये रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या जवळपास 127 फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
या धडक कारवाईतंर्गत नौपाडा प्रभाग समितीतंर्गत 15, उथळसर प्रभाग समितीमध्ये 13, वागळे प्रभाग समितीमध्ये 9, लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये 15, वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये 14, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये 16, मुंब्रा प्रभाग समितीमध्ये 20, कळवा प्रभाग समितीमध्ये 14 आणि दिवा प्रभाग समितीमध्ये 11 अशा एकूण 127 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई परमिमंडळ उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण निष्कासन विभागाने केली.