Friday, May 14 2021 12:39 pm
ताजी बातमी

स्वाभिमान पक्षाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षाची काही अज्ञातांनी जाळली कार….

सिंधुदुर्ग : निवडणुकीची आचारसंहिता चालू होतच सिंधुदुर्गमधील  वातावरण पेटले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष  नारायण राणे यांच्या सावंतवाडी येथील तालुकाध्यक्ष आणि माजी खासदार निलेश राणे यांचे समर्थक संजू परब यांच्या इनोव्हा कारला आग लावण्यात आली.काही आज्ञातांनी काल रात्री उशिरा हा प्रकार घडवून आणला. पालिकेच्या बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात आली.  परंतु गाडी आगीत पूर्णतः जळून खाक झाली होती.
संजू परब हे रात्री बाराच्या सुमारास यांनी नेहमीप्रमाणे आपली गाडी खासकीलवाडा परिसरातील रोड इथल्या साई दीपदर्शन या इमारतीसमोर पार्क केली होती व ते घरी गेले. त्यानंतर रात्री उशिरा काही  आज्ञातांनी गाडी आग लावली. काही तरी जळत असल्याचा आवाज आला. बाहेर येऊन पाहिलं असता गाडी पेटत होती. ती आग विजावण्यात आली  परंतु तो पर्यंत गाडी पूर्णपणे जळलेली होती.राजकीय वैमानस्यातून प्रकार घडल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. घटनास्थळावर यावेळी दारुचे साहित्य तसंच कॅनचे बूच आढळून आले. त्यामुळे गाडीवर काही तरी ज्वलनशील ओतून हा प्रकार केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा सुरु होता.