Friday, June 18 2021 5:27 pm

सीडीआर प्रकरणात अभिनेता नावाजुद्दिन सिद्धिकी याच्या वकिलाला अटक-23 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

 वकील रिजवान सिद्धिकीला बनविले बळीचा बकरा 
* नवाजुद्दीनला वाचविण्यासाठी वकिलाला अटक- तो अधिकारी कोण?
ठाणे :बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात अटक आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेने अभिनेता नावाजुद्दिन सिद्धिकी त्याची पत्नी आणि वकील रिजवान सिद्धिकी यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. अखेर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री मुंबईच्या वर्सोवा येथून वकील रिजवान सिद्धिकी यांना अटक केली. सिदिसर प्रकरणातील हा 12 आरोपी असून त्यापैकी रजनी पंडित यांनाच जमीन मिळालेला आहे.
सिने अभिनेता नावाजुद्दिन सिद्धिकी यांच्या पत्नीचे कॉल रेकोर्ड  वकील रिजवान सिद्धिकी यांनी मागविले होते. सदरबाब हे पोलीस कोठडीतील आरोपींच्या चौकशीत समोर आले. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने जबाब नोंदविण्यासाठी नावाजुद्दिन सिद्धिकी आणि त्यांची पत्नी व  त्यांचे वकील रिजवान सिद्धिकी यांना समन्स पाठविले. मात्र त्याला प्रतिसाद न दिल्याने गुण हे शाखेच्या पथकाने वकील रिजवान सिद्धिकी यांना शुक्रवारी अटक केली. त्यांना न्यायलयात नेले असता 23 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. अभिनेता नावाजुद्दिन यांच्या पत्नीचे सीडीआर सिद्धिकी यांनी कशासाठी मागविले होते याचा खुलासा होणार आहे. रिजवान सिद्धिकी हे बॉलीवूड मधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसाठी वकील म्हणून काम केलेले आहे. शनिवारी रिजवान सिद्धिकी याला ठाणे गुन्हे शाखेने न्यायलयात आणले. सिद्धिकी यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी न्यायलयात युक्तिवाद करीत पोलिसांनी 41(A) ची नोटीस न देता अटक केली असून रिजवान सिद्धिकी निर्दोष असल्याचे सांगितले. न्यायलयाने सिद्धिकी यांना 23 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात अधिक तपस गुन्हे शाखेचे पोलीस करणार आहेत.
   
नावाजुद्दिन सिद्धिकीला वाचविण्यासाठी 
रिजवानचा बळी -वकील मर्चंटचा आरोप 
 न्यायलयात रिजवान सिद्धिकी यांचे वकील रिजवान मर्चंट म्हणाले पोलिसांनी केलेली अटक ही बेकायदेशीर आहे. नावाजुद्दिनच्या पत्नीचा सीडीआर पेशाने वकील असलेला रिजवान सिद्धिकी कशाला काढेल. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुठल्याही प्रकारे नोटीस न देताच केलेली अटक बेकायदेशीर आहे. ठाणे पोलीस नावाजुद्दिन आणि त्याच्या भावाला वाचविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी वकील रिजवान सिद्धिकी याला बळीचा बकरा बनविल्याचा आरोप सिद्धिकी यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. ठाणे पोलीस दलातील खालचे नाही तर वरिष्ठ अधिकारी नावाजुद्दिन आणि त्याच्या भावाला वाचविण्यासाठी खटाटोप करीत वकील रिजवान सिद्धिकी याला अटक करण्यात आली असल्याचा दावा केला.
 नावाजुद्दिन आणि त्याच्या भावाला वाचविणारा अधिकारी कोण ?
नावाजुद्दिन सिद्धिकी हा वकील रिजवान सिद्धीकीचा क्लाईंट आहे. रिजवान यांनी केवळ डिटेक्टिव्ह याची ओळख करून दिली. त्यांनी सीडीआर  काढला. त्याच्याशी रिजवान सिद्धीकीचा संबंध काय? तर ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी हा नवाजुद्दीन आणि त्याच्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे तो अधिकारी कोण? याबाबत मला काहीशी माहिती आहे. ठोस पुरावे घेऊन त्या अधिकारी याच्याशी संवाद साधणार असून बेकायदेशीर अटकेला आम्ही आव्हान देणार असल्याचे सांगितले. दरम्यान न्यायालयाने २३ मार्च पर्यंत दिलेली पोलीस कोठडी हि चुकीची असल्याची प्रतिक्रिया वकील मर्चंट यांनी व्यक्त केली. दुसरीकडे पोलिसांनी लावलेले कलमे ही  बेलेबल ऑफेन्स आहे. म्हणून कलम ४२० चा जाणीवपूर्वक प्रयोग करण्यात आला आहे. फसविल्याची कुणाची तक्रार पोलिसांकडे आहे काय? असा सवालही मर्चंट यांनी करून आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.