Friday, May 14 2021 11:58 am
ताजी बातमी

समुद्रकिनाऱ्यावर होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या ५ जणांचा मृत्यू

नालासोपारा : वसईतील नालासोपाऱ्यातील कलंब समुद्रकिनाऱ्यावर होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या ५ जणांचा बुडून मृत्यू झाला..कलंब समुद्रकिनारी दोन कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली होती आहे. वसईतील गोकुलपार्क या इमारतीमध्ये राहणारे मौर्या आणि गुप्ता या दोन कुटुंबातील सात जण कलंब समुद्रकिनारी पोहण्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास गेले होते.परंतु समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाच जण बुडाल्याची घटना घडली.घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्यांना वाचण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.  यानंतर स्थानिक गावकरी, पोलीस प्रशासन आणि वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शोधमोहीम सुरु केली. बुडालेले पाचही जणांचे मृतदेह मिळाले आहेत. वसईतील दोन कुटुंबातील पाच जण बुडाले होते. 5 जणांपैकी सायंकाळी उशिरा एकाचा मृतदेह सापडला होता. रात्रभर शोधमोहीम केल्यानंतर मध्यरात्री दोघांचे आणि आज सकाळी दोघांचे मृतदेह सापडले आहे. कांचन गुप्ता, शीतल गुप्ता, नीशा मौर्या आणि प्रिया मौर्या यांचे मृतदेह सापडले आहेत.