Friday, May 14 2021 1:00 pm
ताजी बातमी

शहरात उंच इमारती बांधताना विकासक यांनी अग्निसुरक्षेतेबाबत विशेष काळजी घ्यावी : आयुक्त संजीव जयस्वाल

७० मीटरवरील उंच  बांधकामांना एचआरसीची  घ्यावी लागणार मान्यता
ठाणे(१७) : शहरात इमारतीचे बांधकाम करत असताना  सर्व विकासक व वास्तुविशारद  यांनी स्वयंपूर्ण अग्निसुरक्षा उभारावी. स्थानिक रहिवाशांच्या आरोग्य विचार करून अग्निसुरक्षेतेची विशेष काळजी घ्यावी असे मत  ”हाय राइज समितीचे” अध्यक्ष तथा  महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केले.ठाणे महापालिकेच्या माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे आयोजित ‘हाय राइज बिल्डिंगची संरचना,व अग्निसुरक्षेतेबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम अंतर्गत ठाणे  महागरपालिकेसाठीची विकास नियंत्रण नियमावली तयारी केली असून ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली ”हाय राइज समिती ‘गठीत करण्यात आली आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात इमारत बांधकाम करताना  ७० मीटरवरील उंच  बांधकामांना समितीची  मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे.या कार्यशाळेत वास्तुविशारद व एनबीसीचे सदस्य शशिकांत जाधव यांनी हाय राइज बिल्डिंगची संरचना,त्याचे नियोजन व  एनबीसी २०१६ भाग ३ मधील तरतुदी याबाबत मागर्दर्शन केले.तसेच माजी अग्निशमन अधिकारी( हिमाचल प्रदेश व दिल्ली) सतीश ढेरे  यांनी  परदेशात अग्निसुरक्षतेबाबत कशी काळजी घेतली जाते,केंद्र व राज्य शासनाने एनबीसी २०१६ ही  अदयावत नियमावली आणल्याने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थाने ही मार्गदर्शक नियमावली कशी अवलंबवली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त (१)  सुनील चव्हाण, शहर विकास व नियोजन अधिकारी श्री निंबाळकर, उप अभियंता देवेंद्र नेर, तसेच शहर विकास विभागाचे अभियंता यांच्यासोबत ठाणे शहरातील सर्व वास्तुविशारद व विकासक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.