Friday, May 14 2021 1:38 pm
ताजी बातमी

वाहतूक पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियान आणि कार्यक्रमाचे सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

ठाणे :  ठाणे शहर आयुक्तालयामधील वाहतूक शाखेमार्फत १८ जानेवारी,२०२१ ते १७ फेब्रुवारी,२०२१ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त  पोस्टर्स व बॅनर्स लावून जनजागृती करण्यात आली शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा शॉर्टफिल्म स्पर्धा यासारखे कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करण्यात आली तसेच ऑनलाइन माध्यमातून वाहतूक विषयक जनजागृती करण्यात आली.त्याविविध कार्यक्रमाचे आणि जनजागृतीचे सचित्र दर्शन घडविणारी पुस्तिका तयार करण्यात आलेली होती. या पुस्तिकेचे प्रकाशन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते करण्यात आले. आयुक्त फणसळकर यांनी वाहतूक उप-आयुक्त बाळासाहेब पाटील यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
          १८ जानेवारी,२०२१ ते १७ फेब्रुवारी,२०२१ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले होते. या सप्ताह दरम्यान वाहतूक विभागाने विविध पद्धतीने आणि मार्गाने जनजागृतीची एक मोहीम राबविली होती. तर याच सप्ताह दरम्यान  रिक्षा ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, स्कूल बस ड्रायव्हर यांच्यासाठी वेगवेगळे सेमिनार आयोजित करण्यात आले तसेच रक्तदान शिबिर व वैद्यकीय तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आले पथनाट्य, विंटेज कार रॅली, बाईक रॅली या सारख्या कार्यक्रमातून वाहतूक विषयक जनजागृती करण्यात आली वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली. रस्ता सुरक्षा अभियानात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना ठाण्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे ठाण्याचे पोलिस आयुक्त  विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त विवेक मेकला,  ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री विपिन शर्मा व ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते.  ठाणे शहर आयुक्तालया मध्ये आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचे सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी ठाणे पोलीस आयुक्त  विवेक फणसळकर यांच्या हस्ते त्यांच्या  कार्यालयात करण्यात आले. आयुक्त फणसळकर यांनी या प्रकारच्या पुस्तिकेचे कौतुक करून प्रशंसा केली.