Friday, May 14 2021 1:24 pm
ताजी बातमी

वसईमध्ये एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे आणि शिवसैनिकांमध्ये राडा

वसई:  विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवांचा नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळा आज वसईत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भरसभेत राडेबाजी केली. पालिका  “आयुक्त साहेब वेळ द्या, आयुक्त साहेब वेळ द्या” अशी मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकनाथ शिंदे यांच्या समोरच मोठ्रायाने राडा केला. याचवेळी पोलीस आणि शिवसैनिकांनी दोन मनसे कार्यकर्त्यांना चोप ही दिला. पोलिसांनी लागेच या दोघां आणि कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आज मनसेनेते जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव वसईत आले होते. यावेळी त्यांनी वसई पोलीस ठाण्यातच परिवहन सेवेचा कार्यक्रम संपेपर्यंत थांबवण्यात आलं होतं. राडेबाजीचं नेमकं कारण काय आहे .?