Friday, June 18 2021 5:02 pm

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र ? ; शरद पवारांनी दिले संकेत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संवाद साधला यावेळी बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे टिकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

सरकार पाच वर्षे टिकेल

यावेळी बोलताना ते म्हणाले, आपण राज्याला वेगवेगळ्या विचारांचे सरकार दिलं शिवसेना आणि आपण एकत्र काम करू शकतो तिन्ही पक्षांनी योग्य पावले टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्या रीतीने काम करत आहेत. असं कौतुक शरद पवार यांनी यावेळी केले. सरकार झाल्यानंतर किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरू होती. अशी आठवण करुन देताना ‘हे सरकार टिकेल आणि पाच वर्षे टिकेल’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. एवढंच नाही तर पुढे बोलताना ते म्हणाले “हे सरकार टिकेल आणि पाच वर्षात काम करेल नुसतच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभा एकत्रित काम करून सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही” असं शरद पवार यांनी सांगितलं