Wednesday, December 1 2021 5:04 am
latest

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रामलीला मैदानावर आंदोलनस्थळी गेले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रामलीला मैदानावर आंदोलनस्थळी गेले. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि गिरीश महाजन उपस्थित होते.त्यांनी अण्णा हजारे यांच्याबरोबर चर्चा केली. बहुतांश मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र अण्णा हजारे यांना दिले. या पत्राचे जाहीर वाचन शेखावत यांनी केले. त्यानंतर अण्णांनी फडणवीस व शेखावत यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण मागे घेतले. अण्णा हजारे यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. देश भ्रष्टाचार मुक्त होण्याबरोबरच शेतकऱयांचा विकास हा अण्णा हजारे यांचा ध्यास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही हेच ध्येय आहे. केंद्र सरकार लवकरच सर्व मागण्या मान्य करेल. अण्णा हजारे यांना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.