Wednesday, December 1 2021 5:26 am
latest

मीडियासमोर मात्र फेसबुकचं काय आहे म्हणणं…

मुंबई-: जगभरात सध्या नेटकरांचा पसारा फुलून येत आहे, भारतात तरी हव्या तश्या म्हणजेच स्वतःच्या मनासारख्या विचारांचे पैलू नेटकर सर्वांसोबत शेअर करतात. भारत हा लोकशाही देश असल्याने येथे कोणत्याही विषयावर बोलण्यास अनुमती आहे, त्यामुळे काही वेळा सर्वाना सर्वांचेच मत , विचार पटतात असे नाही, त्यामुळे वाद हि मोठ्याप्रमाणात भेडसावत असतात. त्यामुळे, फेसबुकवर आता तुम्ही पोस्ट करताना नीट विचार करा. नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. पोस्टमध्ये आजाद काश्मीर असं असेल किंवा देवी-देवतांवर टीका केली किंवा तिरंग्याचं कापड कंबरेच्या खाली घातलंय असा फोटो हे सर्व बेकायदेशीर ठरेल. अशा 20 पोस्ट आहेत, ज्यांना भारतात फेसबुकनं बेकायदेशीर ठरवलंय. हा दावा इंडियन एक्सप्रेसनं फेसबुकचे आतले डाॅक्युमेंट्स तपासल्यावर केलाय. जगभरातल्या फेसबुक कंटेटवर लक्ष ठेवणारी फेसबुक रिव्ह्युअरची टीम असते. लोक रिपोर्ट करतात किंवा फेसबुकच्या सिस्टिममध्ये काही शब्द चुकीचे ठरवलेले असतात. हे काम करण्यासाठी फेसबुककडे 15 हजार फुल टाइम काँट्रॅकवर काम करणारे कर्मचारी आहेत. ते ठरवतात, कुठली पोस्ट ठेवायची, कुठली काढून टाकायची. भारतात अशा पोस्ट युजरला न सांगता किंवा कायदेशीर सल्ला न घेता काढून टाकण्याचा प्रयोग केला जातोय.

मीडियासमोर मात्र फेसबुकचं काय म्हणणं आहे जाणून घ्या-:

फेसबुकनं असा दावा केलाय की कटेंट ब्लाॅक करण्याआधी फेसबुकचा वकिलांची टीम तपासून पाहते. फेसबुक म्हणतंय की कुठलाही कंटेंट त्या त्या देशात बेकायदेशीर असतो, त्याला फ्लॅग केलं जातं. याला IP-ब्लाॅकिंगही म्हटलं जातं. भारतात तयार झालेल्या अघोषित गाईडलाइन हेच दाखवते की कंपनी आपल्या माॅडरेटर्सकडे कंटेंट रिव्ह्यूसाठी पाठवतं.फेसबुकनं अनेकदा असं सांगितलंय की आंतरराष्ट्रीय पाॅलिसी कुठल्याही श्रद्धेवर किंवा धर्मावर केलेल्या हल्ल्याला भारतात हेट स्पीच म्हणून बघत नाही. पण अनेक असं दिसतंय की अनेक कंपन्या भारतातला अनेक कंटेंट तपासून पहात असतात.