नागपूर,04 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 च्या महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये सातवा आणि ओबीसी प्रवर्गात चौथ्या आलेल्या कोमल गुणवंत ढवळे यांचे माहिती व जनसंपर्क कार्यालय नागपूरचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी अभिनंदन केले.
कोमल ढवळे या ग्रामीण भागातून यशस्वी झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील त्या पहिल्या पदवीधर महिला आहेत. घरची परिस्थिती बेताची असताना त्यांनी हे यश परिश्रमपूर्व संपादन केले आहे. ढवळे यांनी अभ्यासात सातत्य, वाचन आणि बहूश्रुतता यावर अधिक भर दिला. नव्याने स्पर्धेत यशस्वी होणाऱ्यांनी जिद्द आणि चिकाटी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
