Friday, August 6 2021 8:25 am

महापौर नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे मोफत लसीकरण

ठाणे,:  दैनंदिन जीवनात महत्त्वाचा घटक असलेले व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना आज पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने ठाणे महापालिकेतर्फे आज मोफत लसीकरण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे वृत्तपत्र विक्रेत्यांना लसीकरण करणारी ठाणे महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.
ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनच्या आवारात या लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर,आयुक्त बिपिन शर्मा, नगरसेवक सुधीर कोकाटे, हेमंत पवार, आरोग्य अधिकारी डाँ खुशबू आदी यावेळी उपस्थित होते.

वृत्तपत्राव्दारे कोरोना पसरत नाही, असे आवाहन व वैद्यकीय दाखले वेळोवेळी सर्वच वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध करुन ही नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण होते. पर्यायाने त्याचा परिणाम वृत्तपत्रांच्या वितरणावर झाला होता. वृत्त्तपत्र विक्रेत्यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेऊन लसीकरण करण्याची मागणी केली होती. याबाबत महापौरांनी तातडीने दखल घेऊन विक्रेत्यांसाठी विशेष शिबीर आयोजित करणेबाबत आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या सोबत चर्चा केली. आयुक्तांनी देखील मागणी मान्य केली. आज राम गणेश गडकरी रंगायतन येथे वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत लसीकरण करण्यात आले. जवळपास ३०० विक्रेत्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.
महापौर नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेऊन लसीकरण मोहिम राबविल्याबद्दल सर्व विक्रेत्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आभार व्यक्त केले.