Friday, May 14 2021 12:54 pm
ताजी बातमी

मराठा आरक्षण आजपासून राज्यभरात लागू

मुंबई : १ डिसेंबरला जल्लोष करा,आता आंदोलन नको….. असे आश्वाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते ते अखेर प्रत्यक्षात आले आहे. आजपासून मराठा आरक्षणाचा कायदा राज्यभरात लागू करण्यात आला आहे.

राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर मराठा आरक्षणाच्या विधेयकावर राज्य सरकारने राजपत्र जाहीर केले आहे. मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून मराठा आरक्षणाच्या विधेयकाचे कायद्यात रुपांतरण झाले. त्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदा आजपासून म्हणजेच 1 डिसेंबर 2018 पासून अखेर राज्यभरात लागू झाला आहे. 29 नोव्हेंबर रोजी विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने मंजुरी मिळाली. त्यानंतर काल  मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर आज राजपत्रात अधिसूचना निघाली आहे.यामुळे मराठा आंदोलनाला मोठे यश मिळाले असून समाजात आनंदाचे वातावरण आहे.