Wednesday, December 1 2021 6:08 am
latest

मजूरांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात; जखमींना सोडून चालकासह इतर फरार

वर्धा : सुरत येथे अडकून पडलेल्या मजुरांना घेऊन ओडिशाला निघालेल्या बसला अपघात झाल्याची घटना वर्ध्यात नागपूर-अमरावती महामार्गावर पहाटे घडली.

या अपघातात जखमी झालेल्या मजुरांना सोडून चालकसह सर्वजण घटनास्थळावरुन निघून गेले आहेत.

नागपूर-अमरावती महामार्गावर कारंजा येथील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला.

ही बस पहाटे वर्धा जिल्ह्यात येताच रस्त्यावर आलेल्या एका वन्य प्राण्याला वाचवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वेगात असलेली ही बस उलटली.

जखमींना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे.