Friday, May 14 2021 11:59 am
ताजी बातमी

भरती प्रक्रियेतील बदलाला विरोध दर्शवत राज्यभरातील पोलीस भरती उमेदवार पुणे ते मुंबई मोर्चा काढणार

पुणे-: भरती प्रक्रियेतील बदलाला विरोध दर्शवत हा बदल रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे ते मुंबई मोर्चा काढला जाणार आहे. ७ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता नदीपात्रातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाईल. त्यानंतर मागण्यांचे निवेदन घेऊन उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयापासून आझाद मैदानापर्यंत धावत जातील. त्यात राज्यभरातील उमेदवार टप्प्याटप्प्याने सहभागी होतील.
११ फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करण्यात येईल, अशी माहिती पोलीस भरती स्टुडन्ट्स राइट्च्या महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी दिली.
राज्य सरकारने पोलीस भरतीच्या प्रक्रियेत सुरुवातीला लेखी परीक्षा आणि नंतर मैदानी परीक्षा घेण्याचे ऐनवेळी ठरवल्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलीस भरतीमध्ये अचानक करण्यात आलेल्या बदलाच्या विरोधात उमेदवारांनी एकत्र येऊन पोलीस भरती स्टुडन्ट्स राइट्सची स्थापना केली आहे.