Friday, June 18 2021 4:22 pm

पोलादपूर तालुक्यात तौक्ते चक्रीवादळाने ८९० घरे बाधित ! ८२ घराचे पंचनामे पूर्ण

पोलादपूर : हॉटेल प्रकाश कदम पोलादपूर तालुक्यात रविवार रोजी झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात सुमारे ८९० घरांची नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे तहसील कार्यालयामार्फत युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ८२ घरांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलादपूर नुकसान झालेल्या गावातील संख्या पोलादपूर १ ,चरई १९ ,चोळाई २ , तुर्भे बु १३, धारवली ५ , सवाद ३, वाकण ३७, कापडे बु १४ , देवळे ३५ , उमरठ ५० , मोरसडे १०२ , बोरघर १६३ , साखर ३५ पळचिल ३७ , कोतवाल बु १९२, देवपूर ७२ , गोळेगणी ७३ , चांभारगणी ३७ अशी सजा निहाय नुकसान झालेल्या घरांची संख्या आहे. या उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या पैकी चरई १९, उमरठ, ५० तुर्भे बुद्रुक १३ या तीन गावातील ८२ घरांचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित गावातील नुकसानीचे पंचनामे तहसील कार्यालयामार्फत तलाठी यांचेमार्फत सुरू आहेत.
पोलादपूर तालुका हा अति दुर्गम डोंगराळ असल्याने आणि अद्यापही वादळ, वारा, पाऊस सुरूच असल्याने पंचनामे करण्यास अडचणी येत आहेत मात्र येत्या दोन दिवसात सर्व पंचनामे पूर्ण होतील असा विश्वास तहसीलदार दिप्ती देसाई यांनी व्यक्त केला आहे.