Friday, June 18 2021 4:18 pm

नववर्षाचे स्वागत जल्लोषात

मुंबई :२०१८ च्या शेवटच्या रात्री बाराचा ठोका पडला आणि देशभरात फटाक्यांच्या आतिशबाजींच्या रोषणाईने उजळून निघाला.नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईने रस्त्यांवर एकच गर्दी केली होती.

 

मुंबईच्या मरीन ड्राईव्हला संध्याकाळपासूनच लोकांनी गर्दी केली होती तर ठाण्यातील तलाव पाळी परिसरात देखील लोकांची गर्दी झाली होती.फटाक्यांच्या आतिशबाजीने प्रदुषण होते म्हणून लोकांनी फुगे आकाशात सोडून नविन वर्षाचे स्वागत केले.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भारताचे प्रवेशद्वार असलेल्या मुंबईतील गेट ऑफ इंडियावर विद्द्युत रोषणाई करण्यात आली होती.सकाळपासून शहरातील अनेक भागत पोलिस बंदोबस्त असल्यामुळे तरुणांकडून हुल्लड़बाजी कमी प्रमाणात दिसण्यात आली.शहरातील रिसोर्ट आणि फार्म हाउस वर तरुणाई ने खुप गर्दी केली होती गोवा आणि दिल्ली ह्या शहरांसह देशात अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतिशबाजी करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले.सर्वत्र सुरु असलेला जल्लोष आणि धिंगाणा पहाटेपर्यंत दिसून आला.

याचबरोबर जगभरात नववर्षाचा जल्लोष पाहायला मिळाला.टोंगा,आयर्लंड येथे सर्वात आधी नववर्षाचे स्वागत करण्यात आले .त्यानंतर उत्तर कोरिया ,न्यूझीलंड,ऑस्ट्रेलिया चीन दुबई फ्रांस ह्या देशांसह जगभरात नववर्षाचे आगमन झाले.