Friday, June 18 2021 4:20 pm

दुर्दैवी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने पोलिसाचा मृत्यू.

औरंगाबाद : पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या पोलिस कर्मचा-याच्या अंगावरून ऊसाने भरलेला ट्रॅक्टर गेल्याने मृत्यू झाला. कन्नड-औरंगाबाद रस्त्यावर मकरनपूर पुलाजवळ गुरुवारी (दि. 25) संध्याकाळी सात वाजता ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतले आहे.

कचरू वामन चव्हाण (वय 52) चव्हाण असे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. चव्हाण हे कन्नड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 25) सायंकाळी सातच्या सुमारास कचरू चव्हाण हे कन्नडहून दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी पेेट्रोल पंपावर निघाले होते. त्यावेळी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने त्यांना धडक दिली. यात ट्रॅक्टरचा चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी तात्काळ कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.