Friday, May 14 2021 1:18 pm
ताजी बातमी

तुझ्या बापाचं राज्य आहे का ? आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

वसई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू देणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का,” असं म्हणत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषा वापरली आहे. तसंच शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेचाही समाचार घेतला. शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडा ही आत्महत्या करेल, असं ते म्हणाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपारा इथे रविवारी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केलं.