Friday, May 14 2021 1:20 pm
ताजी बातमी

तलावाच्या संवर्धनासाठी ९१ वर्षाच्या आजोबा सायकल रॅलीत

ठाणे:प्रतिनिधी:— गुडीपाडव्याच्या पूर्व संध्येला पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी शनिवारी ठाणे शहरात सायकल रॅली काढण्यात आली. “सायकल चालवा फिट राहा” असा संदेश देण्यासाठी ह्या सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. तसेच सायकल चालवण्याने इंधनाची बचत होत असुन पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. हाच या मागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सागितले.विशेष म्हणजे ह्या सायकल रॅली मध्ये ९१ वर्षाच्या धरमसी भाटे आजोबानी देखील सहभागी होऊन तरुणांना लाजवेल अशी सायकल चालवत तरुण पिढीसमोर नवा आदर्शच ठेवला आहे.

ठाणे शहर तलावाचे शहर म्हूणन ओळखले जाते, ह्याच तलावाचे संवर्धन रखण्यासाठी ठाण्यातील जेलतलाव,आंबे घोसाळे तलाव,मदारडे तलाव,सिद्धेश्वर तलाव,या चार तलावाचे पाणी एकतरी करीत ठाण्यातील महत्वाचे ओळखल्या जाणाऱ्या मासुंदा तलावात विसर्जित करण्यात आले, तलावाबाबतची जनजागृती व्हावी तलाव स्वच्छ राहावे असा या मागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. दरम्यान यावेळी ठाण्यातील शेकडो सायकल स्वरांनी या रॅली मध्ये सहभाग घेतला होता. कोपिनेश्वर संस्कृती न्यास,क्रीडाभरती ठाणे,आणि तलाव ग्रुप व्हा वतीने हि सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचा पहिला प्रयोग असून दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला ह्या सायकल रॅली चे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजन मुकुंद टांकसाळे यांनी यावेळी सांगितले.