Wednesday, November 12 2025 4:18 pm

ठाण्यातील रेहान सिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला

ठाणे, 08: बारावीच्या आयएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाणे येथील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्यविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आला आहे. त्याला 99.75% (399/400) गुण मिळाले आहेत.

आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहान म्हणाला की, “माझे आई-वडील, आणि माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले आहे. मला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडते. मला कविता आणि इतरही गोष्टींवर लिहायला आवडते. यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेतद्वारे देशाची सेवा करणे हे माझे स्वप्न आणि ध्येय आहे.”