Friday, May 14 2021 12:54 pm
ताजी बातमी

ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन

मुंबई: ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री व माजी खासदार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशी राजकीय वर्तुळत त्यांची ओळख होती एकनाथराव गायकवाड यांच्या निधनाने सर्वसामान्य, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी भक्कमपणे लढणारा बुलंद आवाज हरपला आहे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई प्रदेश काँग्रेसची मोठी जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यांवर घेतली होती. काँग्रेसला महाराष्ट्रात पुढे नेण्याच्या कामात त्यांचा मोलाचा हातभार लागला होता. मुंबईमध्ये त्यांच्या नावाला असणारं वजन पाहता, मुंबई प्रदेश काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. शिवाय त्यांच्या निधनामुळं काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त केलं जात आहे.

एकनाथराव गायकवाड यांनी समाजकारण करताना सर्वसामान्यांचे प्रश्न आपले समजून त्यांना वाचा फोडण्याचे कार्य केले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे ते निष्ठावंत नेतृत्व होते. काँग्रेसच्या विचारधारेशी आजीवन प्रामाणिक राहणाऱ्या गायकवाड यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आम्ही सर्वजण गायकवाड कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी

‘मागील 20- 25 वर्षे आम्ही युवा नेते त्यांच्याकडे ज्येष्ठ नेते या नजरेतून पाहत होतो, त्यांच्या जाण्यामुळे मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये नक्कीच एक पोकळी निर्माण झाली आहे. सर्वांना सोबत नेऊन जाणारं एक नेतृत्त्वं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. आजारपणावर मात करुन ते पुन्हा रुग्णालयातून बाहेर येतील पण, असं काही झालं नाही’, राजकीय कारकिर्दीत कष्ट करण्याती तयारी, एखाद्या गोष्टीच्या पूर्ततेसाठीचा अट्टहास अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्याजोग्या होत्या .