Wednesday, December 1 2021 6:07 am
latest

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते कादर खान यांचे मंगळवारी निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते .कादर खान गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. उपचारासाठी ते कॅनडामध्ये मुलाबरोबर राहत होते. काही दिवसांपूर्वीच कादर खान यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात आज पहाटे नव्या वर्षाची सुरुवात या वाईट बातमीने झाली आहे.

कादर खान यांचा मुलगा सरफराज यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेदरम्यान कादर खान यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कॅनडात अंत्य संस्कार करायचे की, भारतात आणून अंत्यसंस्कार करायचे याबाबत कुटुंबीय निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.अभिनेते अमिताभ बच्‍चन, अनुपम खेर, प्रसिध्‍द गायिका लता मंगेशकर, अभिनेता अर्जुन कपूर, अनुपम खेरसह बॉलिवूडमधील अनेक दिग्‍गज कलाकारांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून शोक व्‍यक्‍त केला आहे.