Friday, May 14 2021 11:42 am
ताजी बातमी

जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे पुण्यात निधन

पुणे : ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन झालं आहे.

वाऱ्यावरची वरात नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे आणि प्रिया मराठे असा परिवार आहे. श्रीकांत मोघे यांनी साठहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत काम केलं आहे.

’पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला आहे.