Wednesday, December 1 2021 5:57 am
latest

चिदंबरम यांचा जाहीर झालेल्या अर्थव्यवस्थेवर टोला

नवी दिल्ली -: ‘एक जुनी सभ्यता जी अनेक धर्म, संस्कृती, भाषा, समुदाय आणि जातींना जोडून ठेवली आहे. गेल्या 71 वर्षांदरम्यान आधुनिक राष्ट्र होण्याच्या दिशेने प्रयत्न केला. मात्र आज त्याचे इतके ध्रुवीकरण आणि विभाजन केले आहे की, त्यापासून आपल्या लोकांना वाचवणे हे चिंतेचे खरे कारण बनले आहे’ असे चिदंबरम यांनी आपल्या पुस्तकाबाबत सांगताना म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 2008 मधील मंदीच्या धक्क्यातून बाहेर आलेली भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या कार्यकाळात रुळावरुन घसरली असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 2008 मध्ये विकास दर हा 7.5 टक्के होता.

‘ज्या लोकांनी अर्थव्यवस्था वर येईल असे विचार मांडले होते. ते लोक आता निराश होऊन सरकारला सोडून जात आहेत. ते खोटे आकडेवारी तयार करतात आणि त्यासाठी लोकांना भरीस पाडतात’ असा आरोप चिदंबरम यांनी केला आहे. ‘अनडॉन्टेड: सेविंग द आयडिया ऑफ इंडिया’ या पुस्तकात पी. चिदंबरम यांनी हे म्हटले आहे. 8 फेब्रुवारी रोजी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

चिदंबरम यांनी काही दिवसांपूर्वी पीयूष गोयल यांनी केलेली नोकरभरतीची घोषणा म्हणजे ‘आणखी एक जुमला’ असल्याची टीका केली होती. पाच वर्ष शांत बसलेल्या या सरकारला अचानक रिक्तपदं भरण्यासाठी आता जाग आली, असा खोचक टोलादेखील चिदंबरम यांनी लगावला होता. तसेच चिदंबरम यांनी गुरुवारी (24 जानेवारी) मोदी सरकारवर ट्वीटरवरुन शाब्दिक हल्ला चढवला होता. ”रेल्वेमध्ये जवळपास पाच वर्षांपासून 2,82,976 पदं रिक्त आहेत. सरकार आता अचानक झोपेतून जागे झाले आहे. तीन महिन्यांमध्ये या रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. हा आणखी एक जुमला आहे, असे ट्वीट चिदंबरम यांनी केले होते.