Friday, May 14 2021 1:29 pm
ताजी बातमी

चित्रा वाघ यांच्या विरोधात अश्लिल पोस्ट टाकणाऱ्या एकास अटक, दुसरा पसार

यवतमाळ : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आवाज उठविणा-या तसेच माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर टीकेची झोड उठविणा-या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट टाकणा-या एकाला मुंबई क्राईम ब्रॅंचच्या सायबर सेलने शुक्रवारी (दि. 5) यवतमाळ जिल्ह्यातून अटक केली आहे. तर दुसरा पसार झाला आहे. मुंबई पोलिसांचे पथक थेट यवतमाळमध्ये दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

राहुल तुळशीराम आडे ( रा. जरंग ता. घाटंजी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पोलीस आल्याची कुणकुण लागताच संतोष राठोड (रा. भांबोरा) हा पसार झाला आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीवरून आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करून चित्रा वाघ यांची बदनामी केल्याचा आरोप या दोघांवर आहे. त्याशिवाय त्यांनी फोनद्वारे धमकावल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यातील पसार झालेला आरोपी संतोष राठोड यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.