Friday, May 14 2021 12:08 pm
ताजी बातमी

कैलास मानसरोवर आणि विदेशातील हिंदू दैवते याविषयी भव्य छायाचित्र प्रदर्शन

नाशिक: नाशिक येथील स्वहिंदू चॅरिटेबल ट्रस्ट आणि चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि. यांच्या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार दि.06 एप्रिल 2018 पासून मंगळवार दि.10 एप्रिल 2018 पर्यंत “कैलास मानसरोवर आणि विदेशातील हिंदू दैवते” या विषयावर माहितीपूर्ण असे भव्य छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे.कैलास मानसरोवराबद्दल भाविकांच्या मनात अनेक समज-गैरसमज असतात. ते दूर होवून त्यांना त्या स्थळांबद्दलची संपूर्ण व योग्य ती सचित्र माहिती उपलब्ध व्हावी हा या प्रदर्शनाच्या मागचा उद्देश असून भारताबाहेरील विविध देशांमधील पुरातन हिंदू मंदिरांची माहितीसुद्धा या छायाचित्र प्रदर्शनामार्फत प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. चौधरी यात्रा कंपनीच्या सहकार्याने स्वहिंदू चॅरिटेबल ट्रस्टने अशी अनेक प्रदर्शन महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आयोजित केली असून त्याचा लाखो लोकांनी लाभ घेवून उपयुक्‍त माहिती मिळविलेली आहे.हे प्रदर्शन श्री अरण्येश्‍वर महादेव मंदिर, खारेगांव तलावाशेजारी, प्रेमनगर समोर, जुना मुंबई-पुणे मार्ग, कळवा, ठाणे येथील बेसमेंट हॉलमध्ये दररोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क उपलब्ध असेल. सदर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन श्री अरण्येश्‍वर महादेव मंदिराचे प्रमुख श्री प्रशांत रामचंद्र बुबेरा यांच्या हस्ते शुक्रवार दि.6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता होईल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विदेशातील अनेक पुरातन मंदिरांची माहिती तर मिळणार आहेच शिवाय कैलास मानसरोवरातील व तेथील परिक्रमेतील विविध स्थळांची इत्यंभूत माहिती छायाचित्रांसह पहायला मिळणार आहे.तेव्हा या अभूतपुर्व संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वहिंदू चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य श्री.सुनिल सोनवणे व चौधरी यात्रा कंपनीचे चेअरमन प्रेमचंद चौधरी, संचालक चतुर्भुज चौधरी, महेंद्रपाल चौधरी व ब्रिजमोहन चौधरी यांनी केले आहे.