Friday, May 24 2019 6:44 am

“#MeToo’ मोहिमेमुळे लोकांच्या मनोवृत्तीत मोठा बदल झाला असून,- पी. व्ही. सिंधू

हैदराबाद-: महिला आणि पुरुषांना त्यांच्या समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली आहे,’ असे मत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केले आहे. “#MeToo’ मोहिमेमुळे लोकांच्या मनोवृत्तीत मोठा बदल झाला असून, विदेशात प्रवास करत असताना मला महिलांचा आदर आणि खासगीपणा जपला जात असल्याचे आढळून येते. भारतातही महिलांचा आदर करावा, असे सांगितले जात असले तरी याची अंमलबजावणी कमी प्रमाणात होते. भारतीय समाजात अनेक चांगले बदलही घडून येत आहेत.असे मत पी. व्ही. सिंधू, हिने व्यक्त केले.