Monday, June 17 2019 4:26 am

MCA ची समिती बरखास्त करा, BCCI ची हायकोर्टात मागणी

मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनची समिती बरखास्त करण्याची मागणी बीसीसीआयच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे तसेच त्यावर तात्काळ व्यवस्थापक नेमावा असेही सुचवण्यात आले आहे.लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची अंतिम मुदत ही सप्टेंबर 2016 होती मात्र तरीही गेले २ वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशन बेकायदेशीर मनमानी करत असल्याचा आरोपही बीसीसीआयच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला.मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे सुरु असलेली टी-२० मुंबई लीग स्पर्धा खेळवण्याचा एमसीएला अधिकारच नाही, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे आणि म्हणूच ही स्पर्धा तात्काळ रद्द करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे
आयोजकांनी या स्पर्धेच्या माध्यमातून उभारलेला निधी तात्काळ हायकोर्टात जमा करावा अशी मागणी करणारी याचिका नदिम मेमन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.  लोढा समितीच्या शिफारशींसंदर्भात जे खटले आहेत, त्यासाठी बीसीसीआयचा निधी वापरण्यास पदाधिकाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. शिवाय, प्रशासक समितीच्या परवानगीशिवाय हे पदाधिकारी विविध बैठकांसाठी दौरे किंवा निवासाची व्यवस्था करू शकत नाहीत  या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी झाली.यावर हायकोर्टानं मुंबई क्रिकेट असोसिएशनसह सर्व प्रतिवादींना उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांचा अवधी देत या प्रकरणाची सुनावणी ३ एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे