Sunday, November 18 2018 9:41 pm

Category: ठाणे

Total 721 Posts

ठाणे जिल्ह्यात २६ लाखांपेक्षा जास्त मुलांना लस देणार शाळा, नर्सरींनी संपूर्ण सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

ठाणे : गोवर व रूबेला आजार मुक्त भारतासाठी गोवर व रूबेला लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात या मोहिमेचा शुभारंभ  27 नोव्हेंबर पासूनकरण्यात येणार असून ठाणे जिल्ह्यातील 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील २६ लाख ८५ हजार ५०१ मुला-मुलींना ही लस देण्यात येणार आहे. आज यासंदर्भातील समन्वयसमितीच्या सभेत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा अशा सूचना केल्या. तसेच सर्व शाळा, नर्सरी यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहनही केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी देखील ठाणे जिल्ह्यात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्नकरण्यात येतील असे सांगितले. उपजिल्हाधिकारी बाळासाहेब तिडके यांनी जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांनाही या योजनेत सामावून घेऊन एकही बालकलसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या. खासगी शाळांना आवाहन यापुर्वी गोवर व रूबेला हे लस दिली असली तरी त्यांना हा अतिरिक्त डोस द्यायचा आहे असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की ठाणे जिल्ह्यातील विशेषत: खासगी शाळांनीतसेच नर्सरी यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या विद्यार्थ्यांना ही लस देऊन मुलांचे आरोग्य सुरक्षित करावयाचे आहे.डॉक्टर्स, विशेषत: बालरोग तज्ज्ञांनी देखील या कार्यात सहभागी होऊन या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. लसीकरणाचे चोख नियोजन या मोहिमेची जिल्ह्यातील अंमलबजावणी कशा रीतीने होणार याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीष रेंघे यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व खासगी, शासकीय शाळा,पालक , संस्थाचालक यांच्यासमवेत  बैठका झाल्या असून त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मोहिमेत शाळांवर लक्ष्य केंद्रित केले असून दूरवरील गावे, पुनर्वसितवसाहती, बांधकाम, वीट भट्ट्याच्या जागा, आदिवासी भाग याठिकाणी फिरत्या वाहनातून लसीकरण केले जाईल. तसेच जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे,वैद्यकीय महाविद्यालये, ग्रामीण आरोग्य केंद्रे अशा ठिकाणी कायमस्वरूपी लसीकरण व्यवस्था असेल. ठाणे पालिका क्षेत्रात ६ लाख ८ हजार ३२२, भिवंडी निझामपूर पालिका क्षेत्रात २ लाख १६हजार ८२१, कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात ३ लाख 51 हजार ९८, मीरा भाईंदर पालिका क्षेत्रात २ लाख ८१ हजार ४९२,

जिल्हाधिकारी स्तरांवरील प्रकरणे लवकर निघणार निकाली जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्तांची बैठक

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील विविध विभागांशी संबंधित असलेली विविध प्रलंबित प्रकरणे मार्गी लागण्याच्यादृष्टीकोनातून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा होवून विविध

हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक अटकेत

ठाणे : प्रख्यात बिल्डर हिरानंदानी यांच्या ठाण्यातील पातलीपाडा येथील प्रकल्पासाठी सर्व्हिस रोडची जागा गिळंकृत केल्याबाबतची तक्रार करण्यासाठीमाहिती अधिकारात माहिती मागवून खंडणी मागितल्यापकारणी भाजपच्या माजी नगरसेवकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.यापूर्वीठाण्यातील माजी नगरसेवक सुधीर बर्गे ययांच्यासह प्रदीप पाटील

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघींना अटक

ठाणे : उच्चंभ्रू वस्तीमध्ये आर्थिक मोबदला घेऊन सेक्स रॅकेट चालविणारी प्रिया जाधव (19) आणि या व्यवसायासाठी घर भाडयाने देणारी रेखा अरोरा (60) अशा दोघींना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक 

कोपर येथील रेल्वे प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मची दिवाळी भेट

·         प्रवाशांचा वळसा वाचणार ·         प्रकल्पाचा खर्च १० कोटी रुपये ·         कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचेही रुंदीकरण होणार ·         मुंबई दिशेकडील पादचारी पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात ठाणे : वाढत्या गर्दीमुळे ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांचा जीव मेटाकुटीला येत

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून ४० ते ५०बेरोजगारांची फसवणूक ,दोघांना अटक

ठाणे : सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरीचे अमिष दाखवून ४० ते ५० बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या  रेल्वेच्या ठेकेदारासह  दोघा आरोपीना ठाणे खडणी विरोधी पथकाने गुरुवारी अटक केली आहे . त्यांच्याकडून २ पिस्टल १ रिव्हॉल्वर १८

ठाण्यात उंच इमारतीवरील परांची कोसळून आठ मजूर जखमी

पाच मजूर हायलँड रुग्णालयात,एक ज्युपिटरमध्ये तर,दोन जखमी सिव्हिल रुग्णालयात दाखल ठाणे : ठाण्यातील रुणवाल गार्डन सिटी या इमारतीच्या बांधकामासाठी दीड वर्षांपूर्वी  बांधलेल्या बांबूच्या परांचीवर काम करण्यासाठी चढलेले आठ मजूर अचानक परांची  तुटल्याने

जून २०१९ पर्यंत पूर्ण होणार पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम

·       सुरक्षिततेची खबरदारी घेऊन खाडीकिनारी काम करण्याच्या सूचना ·       खा. डॉ. शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कामाला गती ·       ठाण्यापुढील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार ५०हून अधिक लोकल फेऱ्या ठाणे : ठाण्यापुढील रेल्वेप्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या

लाच देऊ नका, घेऊ नका दक्षता जनजागृती सप्ताह सुरू

ठाणे : राज्यात यावर्षी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील राज्य सरकारचे विभाग, सहकारी संस्था

कल्याण-डोंबिवलीतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

·       प्रदीर्घ काळ प्रलंबित प्रश्न निकाली ·       रिंग रोडसह अनेक प्रकल्पांना होणार फायदा ·       बीएसयूपी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील २३ कोटी रुपये मिळण्याचा मार्गही मोकळा ठाणे – प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कुठे करायचे, या प्रश्नामुळे प्रदीर्घ काळ