Tuesday, January 22 2019 1:34 pm

Category: ठाणे

Total 1009 Posts

सिडको २५ हजार १०४ घरे सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि मानसरोवर या चार रेल्वे स्थानकांच्या आवारात बांधण्यात येणार आहेत.

ठाणे -: सिडकोने निविदा प्रक्रिया सुरू करूनही नवी मुंबई आणि पनवेल महापालिका अद्यापही साखरझोपेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी कल्याण येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी कामगारांनी केडीएमसी मुख्यालयासमोर ठिय्या मांडला

कल्याण -: सफाई मजूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक, राजेंद्र अढांगळे, सुरजपाल चिंडालिया, प्रशांत गायकवाड, प्रभाकर घेंगड, तर, महात्मा गांधी सफाई कामगार संघटनेचे बाबूभाई जेठवा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन

शासनाने शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाची मर्यादा वाढवून द्यावी, महापौर मिनाक्षी शिंदे करणार मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार  

ठाणे-:  महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नागरिकांना शिधावाटप दुकानातून रॉकेल व इतर धान्य मिळण्यासाठी त्यांचे कौटुंबिकउत्पन्नानुसार पिवळी, केशरी व शुभ्र शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यात आली व यासाठी निश्चित केलेली उत्पन्नमर्यादा गेल्या 20 वर्षापूर्वीच्याउत्पन्नावर आधारित आहे. मात्र या उत्पन्नाच्या मर्यादेत गेल्या 20 वर्षापासून कोणताही बदल झाला नसून उत्पन्नाची मर्यादा वाढवावी जेणेकरुनसर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याची माहितीमहापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी आज दिली. शिधावाटप दुकानात धान्य घेण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याबाबतचे पत्र नुकतेच महापौर यांनी शिधावाटप अधिका-यांना दिलेहोते, या पार्श्वभूमीवर आज शिधावाटप अधिकारी राजू पळसकर व शिधावाटप निरीक्षक वासुदेव पवार यांनी महापौरांची भेट घेतली. गेल्या20 वर्षापासून शिधापत्रिकाधारकांची उत्पन्नाची मर्यादा एकच ठेवण्यात आली आहे, उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्नहोणे गरजेचे असल्याची चर्चा महापौर मिनाक्षी शिंदे यांनी यावेळी केली.  1998 पासून शासनाने शिधापत्रिकाधारकांची उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. 15 हजारापर्यत उत्पन्न असणाऱयाशिधापत्रिकाधारकांना पिवळी, 15001 ते 1 लाख उत्पन्न असणाऱयांना केशरी शिधापत्रिका, 1 लाखांच्यावर उत्पन्न असणाऱयांना शुभ्रशिधापत्रिका देण्यात येत आहे. या मर्यादेमध्ये वाढ करुन 3 लाखांपर्यत उत्पन्न असणाऱया शिधापत्रिकाधारकांना पिवळी,3 ते 5 लाख उत्पन्नअसणाऱयांना केशरी व 5 लाखांच्यावर उत्पन्न असणाऱयांना शुभ्र शिधापत्रिका दिल्यास नागरिकांना त्याचा निश्चितच फायदा होईल.लोकप्रतिनिधी म्हणून समाजात काम करीत असताना प्रभागातील नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ओळखपत्र द्यावे लागते, यासाठीशिधापत्रिका हा एकच पुरावा ग्राह्य धरला जातो. परंतु नागरिक आपले कौटुंबिक उत्पन्न सांगत नाही, त्यामुळे या उत्पन्नाच्या मर्यादेत वाढकेल्यास नागरिकांना याचा फायदा होईलच व नागरिकाचे मूळ उत्पन्न देखील समोर येण्यास मदत होईल.     गेल्या 20 वर्षापासून शासनाने ठरवून दिलेले उत्पन्नच शिधापत्रिकासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे, या उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याबाबतमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती महापौर यांनी यावेळी दिली. जेणेकरुन सर्वसामान्य नागरिकांना येत्या काही काळातच दिलासामिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पंडित मनोहर चिमोटे संगीत महोत्सव 27 जानेवारीला बदलापूरात 

बदलापूर-: हार्मोनियम या पाश्चात वाद्याला भारतीय रूप देऊन तिला संवादिनीच्या रूपात भारतीय संगीतात मानाचे स्थान मिळवून देणाऱया स्व. पंडित मनोहर चिमोटे यांच्या नावाने पं. मनोहर चिमोटे संगीत महोत्सव- 2019 बदलापूरात

२३ जानेवारी बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त व्यंगचित्रकला स्पर्धा व प्रदर्शन

ठाणे-:  शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी २०१९ जयंती प्रित्यर्थ व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्यंगचित्रकला स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केले आहे .स्पर्धेचं हे सहावे वर्ष असून,या

रेल्वे प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन, रेल्वे सुरक्षा बलाचे दुर्लक्ष 

ठाणे -: रेल्वे प्रशासनाने फेरीवाल्यांना स्थानक परिसराच्या हद्दीत बसण्यास परवानगी नाकारली असून देखील स्थानक परिसरात फेरीवाले आजही आपला धंदा थाटून बसत आहेत, तसेच लोकल डब्यामध्ये देखील फेरीवाले मालाची विक्री करत असल्याने

संजय भालेराव यांना नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीज्चा राज्यस्तरीय पुरस्कार

ठाणे-:  नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीज् (एनडीएमजे)च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दै. ‘कोकण सकाळ’चे कार्यकारी संपादक संजय भालेराव यांना जाहीर करण्यात आला आहे. आंबेडकरी विचारधारा आणि संविधानिक

रेल्वे स्थानकावर हरवलेल्या मुलांचे मनपरिवर्तन करण्याचे काम गेले 15 वर्ष ठाण्यातील समतोल फाउंडेशन करते

ठाणे-: आपल्या घरापासून खूप दूर मुंबई नगरीत निघून आलेल्या तसेच रेल्वे स्थानकावर हरवलेल्या मुलांचे मनपरिवर्तन करण्याचे काम गेले 15 वर्ष ठाण्यातील समतोल फाउंडेशन करत आहे.मनपरिवर्तन सोबत गरजू मुलांना,शिक्षण अर्धवट राहिलेल्या मुलांना

फूटपाथ पादचाऱ्यांसाठी नसून तर फेरीवाल्यांसाठी भेट, कारवाई केली असून देखील फेरीवाले बिंदास्तपणे फूटपाथवर 

ठाणे-: ठाणे शहरात पादचाऱ्यांना चालण्यासाठी रोडच्या उजव्या आणि डाव्या बाजूला  फूटपाथ  बनविले आहेत परंतु हे फूटपाथ आता पादचाऱ्यांना चालण्यासाठी राहिलेले नसून ते फेरीवाल्यांसाठी व्यवसायाची जागा झाली आहे,आणि याचा त्रास पादचाऱ्यांना

ठाणे महानगरपालिकेच्या शाळांचा मध्यवर्ती क्रीडा महोत्सव संपन्न

ठाणे-: ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित ‘मध्यवर्ती क्रीडा महोत्सवाचा उदघाटन  सोहळा सेंट झेविअर्स हायस्कूल मानपाडा येथे शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी उप आयुक्त मनीष जोशी शिक्षणाधिकारी शेषराव बडे, आंतरराष्ट्रीय  खो खो पट्टू  कुमारी