Sunday, December 16 2018 4:06 am

Category: महाराष्ट्र

Total 251 Posts

२०१८ अपघातात वाढ !

ठाणे-: राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकार दर वर्षी रस्ते सुरक्षा मोहीम राबविते. यात वाहतूक पोलीस, परिवहन विभागाबरोबरच विविध सामाजिक संस्थाही सहभागी होतात. मात्र या मोहिमेनंतरही अपघातांचे प्रमाण कमी

सरकार स्वतःची गोची लपविण्यासाठी गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नेमणूक – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

मुंबई- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रमुखपदी शक्तिकांत दास यांची नेमणूक करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. सरकारने स्वतःची गोची लपविण्यासाठी गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नेमणूक  असेल,

वाद चव्हाट्यावर , गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांचा राजीनामा !

कोल्हापूर-: गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांना बदलण्यासाठी १४ डिसेंबरचा मुहूर्त काढला होता अखेर त्यास पूर्णविराम लागले. १७ पैकी १३ संचालकांनी बंड केल्याने नेते महादेवराव महाडिक व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी.

मुंबई विमानतळात बॉंम्ब असल्याचा निनावी फोन !

मुंबई-: मुंबई विमानतळात बॉंम्ब असल्याचा निनावी फोन आला आहे. हा बाँम्ब मुंबई-दिल्ली या विमानात असल्याचा त्या निनावी फोनवरून सुरक्षा यंत्रणेस सांगितले आहे. आणि हा फोन इंडिगो सुरक्षा यंत्रणाला आला होता,

विजय माल्यास “घोटाळाबाज” म्हणणे चुकीचे – नितीन गडकरी.

मुंबई-: मद्दसम्राट विजय माल्या यांस भारतात आणण्याचा प्रयत्न भारत करत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वादात्म्क विषय पोखरून काढला आहे, एखादा दुर्मिळ अपराध केल्याने लगेचच एखाद्या उद्योगपतीला “घोटाळाबाज” म्हणणे

शिक्षण विभाग शिवाजी महाराजांची पत्नी जिजाऊ ?

ठाणे-: राज्यात ११ वी च्या संस्कृत विषयाच्या आभ्यासक्रमात लातुरच्या निकिता पब्लिकेशन अंतर्गत ‘संस्कृत सारिका’ हे पुस्तक राजेंद्र शास्त्री (गायकवाड) यांनी लिहिलेले आहे. ‘महाराजस्य’ या वंशावळीत राष्ट्रमाता जिजाऊ यांना छत्रपती शिवाजी

धनंजय मुंडेंवर देखील टीका करत, पंकजा मुंडे म्हणाल्या !

बीड : जे आपला नेता रोज बदलतात, ज्यांच्या रक्तातच बेईमानी आहे, तो मुंडे साहेबांचा वारसदार होऊ शकत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंवर टीका केली. दिवंगत गोपीनाथ

मराठा विशेष आरक्षण “प्रमाणपत्र” !

ठाणे-: मराठा जातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. आज लातूरमधील अहमदपूरमध्ये पहिले मराठा जात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. आता हे प्रमाणपत्र कसे काढायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर

पृथ्वी शॉला झालेली दुखापती ठीक झाली असली, परंतु ?

मुंबई-: उद्याच्या कसोटी मालिकेचा भारतीय संघ जाहीर झाला. 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडूंची नावे घोषीत करण्यात आली आहेत. या यादीतून उत्कृष्ट फलंदाज रोहित

ठाणे मनपा वृक्ष प्राधिकरण समितीच्या ग्राह्यतेवर मुंबई उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब !

ठाणे-: ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या ग्राह्यतेवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. तसेचयाचिकाकर्त्याच्या सार्वजनिक हेतूबाबत  मुंबई उच्च न्यायालयाने शंका उपस्थित करत याचिकाकर्त्याला फटकारले आहे.  दोन वर्षांपूर्वी ठाणे मनपा सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर वृक्ष प्राधिकरण समिती 2017 साली गठित करण्यात आली होती. या समितीने ठाणेशहरातील विविध विकासकामांसाठी काही वृक्ष तोडणे व पुनर्रोपणासाठी परवानगी दिली होती. या वृक्षतोडीला आणि वृक्ष प्राधिकरण समितीविरोधात रोहित जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. वेळोवेळी सुनावणी झाल्यानंतर न्यायमूर्ती अभयओक यांचे खंडपीठाने समितीमधील काही सदस्यांबाबत तांत्रिक मुद्दे उपस्थित करत नवनियुक्त समिती आणि समितीने दिलेल्यापरवानगीला स्थगिती दिली होती. त्यानंतर ठामपाने 2018 मध्ये नव्याने वृक्ष प्राधिकरण समिती गठित केली. सामाजिक वनीकरणविभागाच्या 3 शासकीय अधिकाऱयांच्या समितीने छाननी करून एकूण प्राप्त 11 अर्जांपैकी 5 जणांचे अर्ज पात्र केले होते. तसेच 6 नगरसेवकांची समितीवर निवड केली होती. मात्र रोहित जोशी यांनी पांत तावडे व नम्रता जाधव हे तांत्रिकदृष्ट्या पात्र नसल्याच्या कारणावरूनन्यायालयात आव्हान दिले होते. याबाबत त्यांनी 10 डिसेंबर 2018 रोजी प्रतिज्ञापत्र सादर केले. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि श्री.कर्णिक यांनी न्यायालयाकडे अचानक    सादर झालेल्या प्रतिज्ञापत्राबाबत याचिकाकर्त्याला खडसावले व 11 डिसेंबर रोजी विस्तृतपणे सुनावणी घेतली.                                            पांत तावडे यांच्या सामाजिक संस्थेबाबत आणि नम्रता जाधव यांनी सादर केलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रांबाबत रोहित जोशी यांनी आक्षेप घेतलाहोता. ठामपाने विद्यापीठाशी संपर्प साधून नम्रता जाधव आणि पांत तावडे यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत सत्यतापडताळणी केली. सदर सत्यतापडताळणी अहवाल न्यायालयात ठामपाने सादर केला. न्यायलयानेही या अहवालाची छाननी करत अहवाल ग्राह्य धरुन पांत तावडे आणिनम्रता जाधव यांच्या निवडीला आक्षेप नसल्याचे स्पष्ट करत निवडीला हिरवा कंदिल दाखविला.  नव्याने नेमण्यात आलेल्या वृक्ष प्राधिकरणअधिकारी अनुराधा बाबर यांच्या तात्पुरत्या नियुक्तीसंदर्भातील आक्षेपही कोर्टाने फेटाळले.  ठामपाने केलेली 5 तज्ञ  व्यक्तींची निवड आणि 6 नगरसेवकांची केलेली निवड अशा एकूण 11 जणांच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर न्यायलयाने  शिक्कामोर्तब केले. यावेळी उच्चन्यायालयाच्या न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याच्या हेतूबाबत शंका उपस्थित करून विकासकामांच्या आड कोणी येऊ नये असे फटकारले. तसेच2016 पासून वृक्ष प्राधिकरण समिती गठित न झाल्याने रखडलेल्या विकास कामांबाबत खेद व्यक्त केला.ठामपातर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे आणि पांत तावडे व नम्रता जाधव यांचे वतीने ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर यांनी बाजू मांडली.