Friday, April 19 2019 11:48 pm

Yatin Pawar

30 Posts Website

मोरा ते गेट वे ऑफ इंडिया 16 किमीचे सागरी अंतर पार करण्यासाठी स्टारफिश सज्ज

ठाणे ः ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस अ‍कॅडमीचे जलतरणपटू रविवार 2 डिसेंबर रोजी मोरा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया हे सागरी अंतर पारकरणार आहेत. या मोहिमेत स्टारफिशचे 9 जलतरणपटू व कोल्हापूर येथील 1 जलतरणपटू सहभागी होणार आहे. ही सागरी मोहिम यशस्वीरित्या पूर्णकरण्यासाठी सध्या हे सर्व जलतरणपटू महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे मार्गदर्शक कैलास आखाडे, अतुल पुरंदरे यांच्यामार्गदर्शनाखाली कसून सराव करीत आहेत. या स्पर्धेत आशय दगडे, वेदांत गोखले, मानव मोरे, हर्ष पाटील, नितिश मेनन, नील वैद्य, आर्यन डोके, सर्वेश डोके, ईशा शिंदे हे स्टारफिशचे 9जलतरणपटू तर कोल्हापूरचा साईश चौगुले असे एकूण 10 जलतरणपटू सहभागी होणार आहेत. मोरा जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे 16 कि.मीचेसागरी अंतर असून हे दहाही जलतरणपटू वैयक्तिकरित्या हे अंतर पार करण्यासाठी मेहनत घेत आहेत. गेल्यावर्षी या जलतरणपटूंनी रिले पध्दतीने हेअंतर पूर्ण केले होते. यंदा वैयक्तिकरित्या 16 कि.मी चे अंतर पार करण्याचे या जलतरणपटूंचे लक्ष्य असून याकडे ठाणेकरांचे देखील लक्ष लागले आहे. रविवारी सकाळी 9 वाजता मोरा जेट्टी येथून सर्व जलतरणपटूंनी अरबी समुद्रात झेपावणार असून यावेळी जलतरणपटूंना प्रोत्साहित करण्यासाठीसांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. हे सर्व जलतरणपटू अंदाजे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते गेट- वे ऑफ इंडिया येथेपोहचणार असून त्यांचे कौतुक करण्यासाठी मुंबईचे महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर, ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे, आमदार अ‍ॅड आशिष शेलार,आमदार अ‍ॅड निरंजन डावखरे, ठामपाचे उपायुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, महाराष्ट्र राज्य हौशी जलतरणसंघटनेचे सदस्य राजेश मोरे, कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  

मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची नाकेबंदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने दिला आंदोलनाचा इशारा

ठाणे –  मुंबई विद्यापीठामध्ये ऑक्टोबर महिण्यात करण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरु न केल्यास आगामी आठ दिवसांनंतर मुंबई विद्यापीठ आणि शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात

मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची नाकेबंदी – राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने दिला आंदोलनाचा इशारा

ठाणे – मुंबई विद्यापीठामध्ये ऑक्टोबर महिण्यात करण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरु न केल्यास आगामी आठ दिवसांनंतर मुंबई विद्यापीठ आणि शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात

मुंब्र्यातील प्लॅटफॉर्म शाळा सोमवारपासून सुरु होणार मनसेच्या दणक्यानंतर महापालिका प्रशासनाचा निर्णय

रेल्वेस्थानकांवर फिरत असलेल्या तसेच व्यवसाय करत असलेल्या भटक्या मुलांसाठी ठाणे महापालिकेच्या वतीने मुंब्रा स्थानकाबाहेर प्लॅटफॉर्म शाळा उभारण्यात आली आहे परंतु केले कित्येक महिने हि शाळा तयार होऊन घाणीच्या साम्राज्यात धूळ

घोडबंदर येथील एस.जी इंग्रजी शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात – मनेसचा आंदोलनाचा इशारा

ठाणे – घोडबंदर रोड येथील एस.जी. इंग्रजी शाळेकडे जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या शाळेची मान्यता रद्द करावी अन्यथा मनसे स्टाईल

मॅग्रोजची कत्तल करणाऱ्यावर कारवाई त्या जागेवर पुन्हा मॅग्रोजची लागवड करा .

ठाणे :मुंब्रा परिसरात राजरोसपणे मॅग्रोजची कत्तल करून भरणी भूमाफिया टाकीत आहेत. तर खाडीत बेकायदेशीर रेती उपसा करून पर्यावरणाचा नाश करीत आहेत. या आशयाच्या अनेक तक्रारी केल्यानंतरही प्रशासन या गंभीर समस्येकडे

महावितरणचे पोमन येथे नवीन सब स्टेशन कार्यान्वित , कामन परिसरातील १३,९००ग्राहकांना होणार लाभ

कल्याण :महावितरणच्या वसई मंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कामन परिसरातील पोमन(ता.वसई) येथे २२/२२ केव्ही स्विचिंग सब स्टेशन नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे वसई मंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सुमारे १३,९०० ग्राहकांना

मधुमेह- उच्च रक्तदाब व वाढलेल्या वजनामुळे किडनीच्या विकारांमध्ये होतेय वाढ महाराष्ट्रात ४ हजार ६६६ रुग्णांना किडनीची आवश्यकता

मुंबई: वाढत्या लोकसंख्येसोबत आजारांची संख्याही वाढली आहे. धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्याला आपसूकच जडतात. शरीरातील एखाद्या अवयवाचं काम थांबलं की त्याला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

गोरगरीबांच्या घरांवर नांगर फिरवण्याचा प्रयत्न केल्यास महासभा उधळून लावू राष्ट्रवादी काँग्रेसने दिला इशारा

ठाणे:शनिवारी झालेल्या महासभेमध्ये गोंधळ घालून या गोंधळातच कळवा खाडी किनारी असलेल्या सुमारे हजारो झोपड्या निष्कासीत करण्याचा ठराव मंजूर करुन घेतला आहे. गोरगरीबांच्या डोक्यावरचे छप्पर पाडण्याचा ठराव करण्यापूर्वी माणुसकीच्या नात्याने तरी

खिडकीवाटे शिरून अज्ञात चोरट्याने लांबवली पावणेचार लाखांची केबल

ठाणे :बांधकाम सुरु असलेल्या इमारतीतील स्टोअर रूमच्या खिडकीचे लॉक तोडून आत शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी विद्युतीकरणासाठी आणलेली तब्बल पावणेचार लाखांची केबल लांबवल्याची घटना बुधवारी सकाळी वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.याप्रकरणी,वर्तकनगर