Saturday, December 7 2019 11:06 pm

7 व्या बिसनेसवर्ल्डच्या अवॉर्ड समारंभात स्मार्ट सिटीच्या डीजी ठाणे अँपचा सन्मान

ठाणे: इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित ठाणे महानगरपालिकेच्या डीजी ठाणेला ‘ स्मार्ट सिटी मोबाईल अँपचा’ या पुरस्काराने 7 व्या बिसनेसवर्ल्ड स्मार्ट सिटीस ऍण्ड अवॉर्ड समारंभात सन्मानित करण्यात आले. दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ रोजी अंदमान निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथील सभारंभात डीजी ठाणे अँपचे कौतुक करण्यात आले. ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावतीने उप कर निर्धारक व संकलक जी.जी.गोदेपुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्मार्ट सिटीच्या डीजी ठाणेने दृष्टीने उत्कृष्ट कामगिरी केली असून महापालिका व स्थानिक नागरिक यांच्यात डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि सहकार्य साध्य केले आहे. ७ व्या बिसनेसवर्ल्ड स्मार्ट सिटीस ऍण्ड अवॉर्डकरिता नामनिर्देशन मागविण्यात आली होती.यामध्ये विशेष परीक्षकांकडून डीजी ठाणे या डिजिटल प्रणालीला ‘ स्मार्ट सिटी मोबाईल अँपचा विभागात अंदमान निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथील सभारंभात विजयी घोषित करण्यात आले.

स्मार्ट सिटीमध्ये उल्लेंखनीय काम करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा गौरव केला जातो. भारतातील पहिल्या डिजीटल प्लॅटफॉर्म प्रकल्प असणाऱ्या डीजी ठाणे या डिजिटल प्रणालीला बिसनेसवर्ल्ड स्मार्ट सिटीस ऍण्ड अवॉर्ड समारंभात सन्मानित करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली डीजी ठाणे या डिजीटल प्रणालीच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी,ज्येष्ट नागरिक, युवावर्ग यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. डिजिटल युगात ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनाच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या ठाणे महापलिकेच्या स्मार्टसिटीच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्यात आला आहे.