Tuesday, March 26 2019 1:32 pm

5 व्या राज्यस्तरीय याँगमुडो स्पर्धेत ठाणे जिल्हा संघास घवघवीत यश !

ठाणे-: राज्यस्तरीय याँगमुडो स्पर्धा 8 व 9 डिसेंबर रोजी सोलापूर येथेसंपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 350 विद्यार्थी सहभागी झाले होते.तसेच ठाणे जिल्हा संघाने देखील या स्पर्धेत सभाग घेतला होता. ट्रडिशनलस्पोर्टस् ऍकॅडमीच्या 15 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, 4 विद्यार्थ्यांनी रौप्यपदक व 6 विद्यार्थ्यांनी कांस्यपदक मिळविले. या विद्यार्थ्याना राष्ट्रीय प्रशिक्षकसुनिल काशिद यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत ठाणे जिह्याला तृतीयक्रमांकाचे पारितोषिक  मिळाले.

पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे –

सुवर्णपदक – अक्षय, आशिन, अनिमेश, साहिल, आनिश, श्रेयस, वरुण, वेदांत,अंकुर, समिरा, लक्ष, आयुष, भूमी, मृणाल, कनिष्का.

रौप्यपदक – प्रिन्स, मेघा, रोशनी, श्रेया

कांस्यपदक – युक्ता, यश, मित, कुशल, कुणाल आणि प्राप्ती.

याँगमुडो जिह्याचे अध्यक्ष केदार जोशी तसेच रोहित नारकर, अपर्णा रॉय वपुनिथा दास यांनी संघातील खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱया प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.