Wednesday, March 26 2025 3:57 pm

5 वर्षापर्यंच्या सर्व बालकांसाठी 10 डिसेंबर रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम

ठाणे 08 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे यासाठी राज्यात सन 1995 पासून उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम दरवर्षी राबविण्यात येते.

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रामध्ये सदर लसी मोफत उपलब्ध करण्यात आल्या असून त्याचा लाभ पालकांनी 0-5 वर्षापर्यतच्या सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.