Tuesday, December 10 2024 8:22 am

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभारपत्रांच्या माध्यमातून अनोखी “आभारपत्र तुला” ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून प्राण वाचलेल्या ५१ हजार रुग्णांच्या नातेवाईकांकडून आभारपत्र

मुख्यमंत्री शिंदे यांनी नम्रपणे नाकारली तुला; लाभार्थी रूग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून दिवाळी- भाऊबीजेच्या शुभेच्छा

ठाणे, ४ – लाडू तुला – ग्रंथ तुला – सुवर्ण तुला या पद्धतीच्या तुला आजपर्यंत आपण सर्वांनी ऐकल्या असतील. पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक अनोखी तुला आज ठाण्यामध्ये करण्यात आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून प्राण वाचलेल्या तब्बल ५१ हजार पेक्षा अधिक रुग्णांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आभार पत्र तुला आयोजित करण्यात आली होती. भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला “देवदूताची आभार पत्रे तुला” या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील आनंदाश्रम येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी online पध्दतीने उपस्थिती दर्शवली ; मात्र मला कायम रुग्णांच्या ऋणात राहायला आवडेल असे सांगत “आभार पत्रे तुला” करण्यास नम्रपणे नकार दिला. यावेळी समस्त रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी आमचं आयुष्य तुम्हाला लाभो अशा भावनिक प्रतिक्रिया दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मिठाई भेट देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.